भजनी मालिका
← भजनांकडे परत

संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितों वोझें खरा ऐसा

sampatti dekhoni mhanati majhen majhen | vagaviton vojhen khara aisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितों वोझें खरा ऐसा ॥१॥ क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती । न कळे तयाप्रती अंध जैसा ॥२॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । हरिनाम सार जपे सदां ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसें मातु । धरी रे सांगातु वैष्णावांचा ॥४॥