भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्रेम करितां भजन । नोहे भावाचें बंधन

saprem karitan bhajan | nohe bhavachen bandhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सप्रेम करितां भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥ भक्तांचे आधीन देवो । नाहीं नाहीं हो संदेहो ॥२॥ भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥ भक्तामाजीं देव असे । देवा अंगीं भक्त दिसे ॥४॥ ऐशी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥