संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें
santachya vibhuti jagasi upadesh | detati sauras sarvabhaven
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
santachya vibhuti jagasi upadesh | detati sauras sarvabhaven
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
santanchya helane batalen jen tond | pratyaksha ten kund charmakachen
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥
santannin sarata kelon taisepari | chandanin te bori vyapiyeli
संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥
santampashi apar sukh | harikha harikh vosande
संतांपाशी अपार सुख । हरिखा हरिख वोसंडे ॥१॥ बोलती वचनें तेचि वेद । शास्त्रानुवाद विहिताचे ॥२॥
santapashin arta yachen | sange jivichen nij guj
संतापाशीं आर्त याचें । सांगे जिवीचें निज गुज ॥१॥ उपदेशिला चतुरानन । तेंचि ब्रम्हज्ञान अनुवादें ॥२॥
santapashin bahu asaven maryada | phalakatacha dhanda ur phodi
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥
santapotin dev vase | deva potin sant ase
संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥ ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
santavachoniyan nam naye hatan | sadhanen sandhitan koti jana
संतावाचोनियां नाम नये हातां । साधनें सांधितां कोटी जाणा ॥१॥ जैसें कातेंविण कारणें संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥
santavachoniyan sukh kothen nahin | amrut tyanche payin nitya vase
संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥ संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥
santansi kshobhavi konya hi prakaren | tyachen navhen baren ubhayalokin
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥
santansi ton nahin sanmanachi chad | pari pade dvad avherito
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
santasi bhetata ang chorito jan veshya sura ura olangito
संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो ।।१।। देवाकरीता पैका देता रडे रुका। विषयालागी फुका लुटीतसे ॥२॥
santansi vinmukh jalasi gavhara | nahin atan thara ihaparalokin
संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं ॥१॥ नाहीं वेडया संतांचा अंगवळा । झोंप बैसली डोळां अज्ञानाची ॥२॥
santasi vinmukh jhala jo gavhar
संतासी विन्मुख झाला जो गव्हार । नाही आता थार इहपरलोकी ॥१॥
santi kela angikar | maj ha nirdhar banala
संती केला अंगिकार । मज हा निर्धार बाणला ॥१॥ त्यांचिया बोलें अभयदानें । नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥
santin kela angikar | tyasi abhiman thor
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि ॥ध्रु.॥
satin kela upakar | maj nirdhar banala
सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥ चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥
santin jaya hatin dharilen | bramhasanatan te pavale
संतीं जया हातीं धरिलें । ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥ आणिकां दुर्लभ जें साधनें । यांच्या प्राप्त अवलोकनें ॥२॥
santi thevilen nishchal thayin | chitta hen payin apuliye
संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥ तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥
santin sangitalen maj | apuliye guj antarinche
संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥ म्हणती आठवीं पंढरीनाथा । सांडीं वार्ता इतरांची ॥२॥