भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतीं जया हातीं धरिलें । ब्रम्हसनातन ते पावले

santin jaya hatin dharilen | bramhasanatan te pavale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतीं जया हातीं धरिलें । ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥ आणिकां दुर्लभ जें साधनें । यांच्या प्राप्‍त अवलोकनें ॥२॥ फळ अनापेक्ष पावती । प्राणी यांचिये संगतीं ॥३॥ निळा म्हणे कल्पतरु । सामान्य दाते हे ईश्वरु ॥४॥