भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें

santanchya helane batalen jen tond | pratyaksha ten kund charmakachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥ तुका म्हणे केली प्रज्ञा या च साठी । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥