भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतासी विन्मुख झाला जो गव्हार

santasi vinmukh jhala jo gavhar

संतासी विन्मुख झाला जो गव्हार । नाही आता थार इहपरलोकी ॥१॥ नाही कळला वेड्या संतांचा अंगवा । झोप वैसली डोळा अज्ञानाची ॥२॥ प्रांतीने तुझी पुरविली पाठी । सज्जनाच्या गोष्टी कड़ झाल्या ॥३॥ हाता आला लाभ गमविला सारा । भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥ मोह सर्पे तुझे व्यापियले अंग । म्हणे पांडुरंग काय आतां ॥५॥