भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली

santannin sarata kelon taisepari | chandanin te bori vyapiyeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥ तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥