भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांपाशी अपार सुख । हरिखा हरिख वोसंडे

santampashi apar sukh | harikha harikh vosande

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतांपाशी अपार सुख । हरिखा हरिख वोसंडे ॥१॥ बोलती वचनें तेचि वेद । शास्त्रानुवाद विहिताचे ॥२॥ पुरातन ज्या ज्या उत्तम वाटा । दाविती चोखटां भाविकां ॥३॥ निळा म्हणे यांचा धंदा । हाचि सर्वदा गुण वाणी ॥४॥