भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें

santachya vibhuti jagasi upadesh | detati sauras sarvabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥ एका जनार्दनीं सर्वामाजी श्रेष्ठ । संत ते वरिष्ठ वंदू आम्हीं ॥३॥