भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर

santin kela angikar | tyasi abhiman thor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि ॥ध्रु.॥ तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥२॥ नसतां कांहीं संचित । भेटी झाली अवचित ॥३॥ देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥४॥