भजनी मालिका

भजने

श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥ सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥ तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥१॥ कटावरी कर समचरन साजिरे । देखावया झुरे माझें मन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा ॥१॥ पीतांबर कासें वैजंयंती कंठीं । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥ पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥ कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें ॥१॥ सांवळां सुंदर कटीं ठेवुनीं कर । रुप तें नगर भीमातीरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें ॥१॥ श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाये शंकर उमा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीराम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजपाशी । सकळ देहीं श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥ जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खाण । आत्माराम हें अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे ॥१॥ श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोची तपराशी पावन झाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥ पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥ उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥ यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौर्‍याशींचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं ॥१॥ पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ