भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें

shrimukh sundar vatolen | kaisen nilotpal sanvalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥ पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥ थिरू वांसरें होकरी । पुढें वाहती पावे मोहरी ॥३॥ हातीं घेऊनि वेताटी । कैसा लागे वासुरा पाठीं ॥४॥ बाळांगोपाळांसहित मुरारी । खेळू खेळे नानापरी ॥५॥ विष्णुदास नामयाचा दातारु । ब्रह्मादिकां त्याचा नकळे पारु ॥६॥