भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी

shrimukh changale kanse pitambar | vaijayanti har rule kanthi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥ तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥ बहुतांचें धावणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥ चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥