भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें

shripad mhanati yachya doshastav | majhen punya sarva laya jaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥ सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥ जाउनी वाराणसीं मठी प्रवेशले । मग पाचारिलें चैतन्यासी ॥३॥ तुझें कोणी होतें सत्य सांग आतां । अन्यथा बोलतां उरी नाहीं ॥४॥ चैतन्यें चरणीं ठेवियेला माथा । म्हणे त्यागुनी कांता आलों स्वामी ॥५॥ उठवोनी श्रीपादें दिधलें आश्वासन । म्हणतां करी पाणिग्रहण इचें आतां ॥६॥ अविधि कर्माचें न धरावें भय । यासी आहे साह्य जगदीश ॥७॥ स्वदेशा जाउनी करावा आश्रमु । सुखरुप स्वधर्मु चालवावा ॥८॥ श्रीपादें मस्तकीं हात ठेवियेला । निरोप दिधला चैतन्यासी ॥९॥