भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें

shrimukhachen sukh pahatan pahatan | nayan tattvatan vedhalen majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें ॥१॥ सांवळां सुंदर कटीं ठेवुनीं कर । रुप तें नगर भीमातीरीं ॥२॥ नित्य परमानंद आनंद सोहळा । सनकादिक या स्थळीं येती जातीं ॥३॥ वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद । दिंड्या मकरंद हर्ष बहु ॥४॥ सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर । जडजीवां उद्धार स्नानमात्रें ॥५॥ एक जनार्दनीं मुक्तांचे माहेर । क्षेत्र तें साचार पंढरपूर ॥६॥