भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी

shrimukhachi shobha kasturi malavat | ubha ase nit vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥ कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥ वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥ चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥