भजनी मालिका

भजने

मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ती केलें ॥१॥ भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरी कृष्ण गोविंद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥ वाउगा तूं न करी सोस । दृढ घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें ॥१॥ किती शिकवावें तूंतें । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलतां तूंतें । नायकसी पामरा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥ धरीं विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत ॥१॥ कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठठल हरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा ॥१॥ मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां ॥१॥ कल्पना सोडोनि संतासंगें राहें । सर्व सुख आहे त्यांचे पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ