भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन हें लोंधलें प्रपंचा विसरलें

man hen londhalen prapancha visaralen

मन हें लोंधलें प्रपंचा विसरलें । मीपण गेलें तुजमाजी ॥ तूं आम्हां गोसावी सुखादि क्षेम न ठेवी । आपली सुखपदवी देई भोगूं ॥ तेथूनि वेगळें होतां प्राण जाईल आतां । नामाचा न व्हावा वियोगु रया ॥१॥ तुझें नाम ध्यान कीर्तन आतां । न विसंबे सर्वथा तुझिया पायां ॥ पायापासूनि वृत्ति माथां चढे । ह्रदयीं धरिलासि सबाह्य रया ॥२॥ ऐसिया वृत्ति ध्यान ध्यावों कां माझें मन । होय तुज समान मीपण नाहीं ॥ अनंत गोवळु अलगटु दावितासी नेटपाटु काय वानूं तुझी सुरपदवी । ठाण त्रिभंगी देखोनी देवढें सुंदर आठवू विसरु हा नाहीं रया ॥३॥ तोचि तूं आतां वेगळेपणें पाहतां । इंद्रियाची सत्ता वर्तविता ॥ कीं परतोनि पाहातां प्रपंच निमाला । तुजमाजी तेथें नातळे द्वैतभावो ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलु पाहतां । पाहणें निमोनियां उरे रया ॥४॥