भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां

mana nako nako hindon darodarin | kashta jhale bhari yetan jatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां ॥१॥ कल्पना सोडोनि संतासंगें राहें । सर्व सुख आहे त्यांचे पायीं ॥२॥ ज्याचिया दरुशनें शोक मोह जळे । पाप ताप पळे काळभय ॥३॥ जवळीच दिसे भावितां भावितां । एका जनार्दनीं ध्यातां सुख मोठें ॥४॥