भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें

mana tun adhir adhir | bahu pataki pamar | na rahasi sthir | kshanabhar nishchayen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें ॥१॥ किती शिकवावें तूंतें । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलतां तूंतें । नायकसी पामरा ॥२॥ एकपणें धरी भाव । दृढ चित्तीं विठ्ठलराव । वाउगा तो भेव । नको धरूं आणीक ॥३॥ हेंचि धरीं शिकविलें । कांहीं नको आन दुजें वहिलें । एका जनार्दनीं बोले । करुणा भरीत मनासी ॥४॥