भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना तूं एक करीं । वाचे आठवी श्रीहरी

mana tun ek karin | vache athavi shrihari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना तूं एक करीं । वाचे आठवी श्रीहरी ॥१॥ आणिक न करी साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥ सर्व काळ हाचि धंदा । वाचे आठवी गोविंदा ॥३॥ तेणें जीवा सोडवण । शरण एका जनार्दन ॥४॥