भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला

manamohan muralivala | nandacha alabela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥ भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥