भजनी मालिका

भजने

भक्तीची अपेक्षा धरोनि अंतरीं । राहे भीमातीरी पंढरीये ॥१॥ अठ्ठावीस युगें गेलींज विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देखा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥ भक्ति तें मुळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥ अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥ भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तीभावें आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥१॥ तरी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि । संतां वोळगोनि वश्य किजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप ॥१॥ एक एक योनि कोटि कोटि फेरा । मनुष्य देहवारा मग लागे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तीसाठी केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्त् पूजिती भगवंता । भगवंत पूजी आपुल्या भक्तां ॥१॥ ऐसा प्रीतीचा कळवळा । परस्परें हा सोहळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्षूनियां पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण ॥१॥ विश्वकर्म्यालागीं तेव्हां आज्ञा केली । क्षणांत रचिली सुदामपुरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम