भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीभावें आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी

bhaktibhaven ahmi bandhilase ganthi | sadhaviton hatin ghya re koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तीभावें आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥ सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥ मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हाचि सांटा ॥३॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चित्त शुद्ध करीं ॥४॥