भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि

bhaktivin moksha nahin ha siddhant | ved bole hat ubharoni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥१॥ तरी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि । संतां वोळगोनि वश्य किजे ॥२॥ प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला । पाहिजे साक्षिला सद्‍गुरु तो ॥३॥ नामा म्हणे सेवा घडावी संतांची । घ्यावी कृपा त्याची तेंचि ज्ञान ॥४॥