भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीची अपेक्षा धरोनि अंतरीं । राहे भीमातीरी पंढरीये

bhaktichi apeksha dharoni antarin | rahe bhimatiri pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तीची अपेक्षा धरोनि अंतरीं । राहे भीमातीरी पंढरीये ॥१॥ अठ्ठावीस युगें गेलींज विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देखा ॥२॥ कटीं कर उभा शिणलें शरीर । धरोनि निर्धार भक्तिभावें ॥३॥ नामा म्हणे आतां नको खटपट । आमुचे बोभाट नको पाहूं ॥४॥