भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्षूनियां पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण

bhakshuniyan pohe santushta jahala | mag anandala narayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्षूनियां पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण ॥१॥ विश्वकर्म्यालागीं तेव्हां आज्ञा केली । क्षणांत रचिली सुदामपुरी ॥२॥ सर्व सुवर्णाची द्वारकेप्रमाणें । ब्राम्हणासी दान गुप्त दिल्हें ॥३॥ नामा म्हणे दुजा नाहीं देवावीण । देतांघेतां जाण पांडुरंग ॥४॥