भजनी मालिका

भजने

भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं। ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढें ॥१॥ परि नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व । हा रस अद्‌भुत निरुपमु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्त म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाठी ॥१॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥ इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्त समागमें सर्वभावें हरी । सर्व काम करी न संगतां ॥१॥ सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्त स्तवनें जें जें करिती । तें जें ऐकोनियां श्रीपती । सुखें संतोषोनियां चित्तीं । दासा देती वरदानें ॥१॥ ध्रुवानें वनीं आराधिला । तैसाचि उपमन्यें स्तविला ।एक तो अढळपदीं स्थपिला । एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥ मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥ पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तजनवत्सल सुखसिंधुराशी । निर्भर मानसीं परमानंदें ॥१॥ सरिसे सकळ भक्त घेउनि पंढरिनाथ । चालिले अक्षत द्यावयासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरी ॠणी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्तदशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥ भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होतां देवा येतसे क्रोध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयीं ॥१॥ भक्त तोचि देव भक्त तोचिक देव । जाणती हा भाव अनुभवीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ