भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त विठोबाचे भोळे । त्याचे पायीं ज्ञान लोळे

bhakta vithobache bhole | tyache payin dnyan lole

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्त विठोबाचे भोळे । त्याचे पायीं ज्ञान लोळे ॥१॥ भक्तिवीण शब्दज्ञान । व्यर्थ अवघें तें जाण ॥२॥ नाहीं ज्याचे चित्तीं भक्ति । जळो तयाची व्युत्पत्ति ॥३॥ नामा ह्मणे ऐसें जाण । नाहीं भक्तासी बंधन ॥४॥