भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तदशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये

bhaktadashanen dev te toshati | tenen anand chittin devachiye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तदशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥ भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होतां देवा येतसे क्रोध ॥२॥ भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दानीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥