भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तकृपाळू माउली । कटीं कर उभी ठेली

bhaktakrupalu mauli | katin kar ubhi theli

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तकृपाळू माउली । कटीं कर उभी ठेली ॥१॥ मोहें पाहे मुखाकडे । भेटावया वाडें कोडें ॥२॥ परम प्रीतीचा वोरस । सदांसर्वदां उल्हास ॥३॥ निळा म्हणे सुप्रसन्न । भक्तांलागी हास्यवदन ॥४॥