भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें

bhaktakaruna bahut tujhiya antara | maj vishvambhara kalon alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥ पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥ कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥ हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥ तुका म्हणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥