भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं

bhaktaruni dev bolati puranen | nirdhar vachanen sach karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥ मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥ माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥ तुका म्हणे ऐसा नाहीं ज्यासि निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥६॥