भजनी मालिका

भजने

पोट आलें आतां जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवाचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पोट धालें मग न लगे पंगती । झालिया निंश्चिती खेळ गोड ॥१॥ आपुलिया हातें देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥ अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पोटासाठीं जरी करी हरीकथा । जन रंजविता फिर-तसे ॥१॥ तेणें घात केला एकोत्तरशत कुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पोटासाठी लागे नीचचियां पायां । करीना भलिया नमस्कार ॥१॥ स्वयंपाकीच्या करितो टवाळ्या । आपण खाये शिळ्या भाकरीतें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥ भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पोटीं भय आतां तुजला कशाचें । ध्येय हेंशिवाचें अवतरलें ॥१॥ तरले अपार पापी मुढ जन । ऐकतां चिंतन देव तोषे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥ तयापारी उदरा आलों जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्हीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पोटींचेंचि परि नेणतें बाळ । नेणें काळ वेळ मागतां ॥१॥ आळी त्याची देखानियां । पुरविती थाया मायबापें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पोर निर्दय जालें देवपिसें लागलें। लोकाचें गोविलें तेंहि पोर ।।१।। नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिलीं । कळी मांडियेली याही पोरें ||२||

रचनाकार: संत गोणाई