भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैलमेरुच्या शिखरीं

pailameruchya shikharin

पैलमेरुच्या शिखरीं । एक योगि निराकारी । मुद्रा लावुनि खेंचरी । तो ब्रह्मपदीं बैसला ॥१॥ तेणें सांडियेली माया । त्यजियेली कंथा काया । मन गेलें विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥२॥ अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद । उन्मनी तुर्याविनोदें । छंदें छंदें डोलतुसे ॥३॥ ज्ञानगोदावरीच्या तीरीं । स्नान केलें पांचाळेश्वरीं । ज्ञानदेवाच्या अंतरीं । दत्तात्रेय योगिया ॥४॥