भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया

potin shul angin uti chandanachi | avadi sukhachi kon taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥ तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥