भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटासाठीं जरी करी हरीकथा । जन रंजविता फिर-तसे

potasathin jari kari harikatha | jan ranjavita phir-tase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पोटासाठीं जरी करी हरीकथा । जन रंजविता फिर-तसे ॥१॥ तेणें घात केला एकोत्तरशत कुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥२॥ द्रव्याचिये आशें हरिकथा करी । तया यमपुरीं नित्य वास ॥३॥ नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी । ते नर नयनीं पाहूं नये ॥४॥