भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोई अव्हेरितां राये मार्गे ऋषि धांवताहे

poi avheritan raye marge rushi dhanvatahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पोई अव्हेरितां राये मार्गे ऋषि धांवताहे ।।१।। धन्य धन्य रे नरेंद्रा हातीं धरीं हरिश्चंद्रा ॥२॥ उष्ण न ध्यानीं कहार मार्गी श्रम झाला फार ॥३॥ करा आश्रम पुण्यता। आम्हां घड द्यावें तीर्था ॥ ४॥ येथें ‘केलिया आराम। व्यर्थ जाती वांयां श्रम॥५॥ क्रमीं चार दिवस पाहा पोईचा हा वास ॥६॥ द्यावी आम्हां सर्व जोडी । कृपा कराल ती थोडी ।।७।। करा आनंदें भोजन सेवा सिद्ध उदकपान ॥८॥ म्हणे जावें आश्रमाला । पुढें पंथासी लागला ॥९॥ त्राहें बाहें रे जगदीशा सत्त्व रक्षिसील कैसा ||१०|| ऐसा छळक हा ऋषि नेणों पार कैसा देशी।।११।। आमची चिंता तुजला हरी जनी म्हणे कृपा करी ।।१२।।