भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप

potache te nat pahon naye chhand | vishayanche bhed vishayarup

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥ अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥ देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥