भजनी मालिका

भजने

पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥ लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ कांहीं कोणावरी नाहीं पडलें ओझें । कष्टी निवृत्तिराज होत असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥ करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं ॥१॥ म्हणवितां दास मनीं धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥ स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥ ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा । विठ्ठल अपारा जप करा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥ इच्छामात्रें करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव