भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं

pujeche prakar asati sola bara | te mi datara nenen kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं ॥१॥ म्हणवितां दास मनीं धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥ सायास संकट न करी व्रताचार । गाईन निरंतर जनार्दनु ॥३॥ एका जनार्दनीं शरआण मने वाचें । तया पूजनाचें सुख होय ॥४॥