भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्ण ब्रह्म होय गे

purna brahma hoy ge

रचनाकार: संत रामदास · अभंग
पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णूं मी आतां काय गे नंद ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय रे क्षीरसागरवासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी ग अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे चोख्यामेळ्यासंगें जेवी । दहीदूध भात गे नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे रामदास प्रेमें गाय । नित्य त्याचा छंदगे