भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं

purna krupa jhali taya | gelon lagatoniyan nij charanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं ॥१॥ न देखती ते हरिविण । जनीं जनार्दन कोंदला ॥२॥ आनंदे त्या अळविती । वोसणती हरिनामें ॥३॥ निळा म्हणे देवचि झाले । भावा आले तयाचिया ॥४॥