भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख

purnapasuni ale ankh | shekhi purnachi nure lekh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥ पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥ दशक वाढवूनी शेवटीं । पूर्णपणें घाली पोटीं ॥३॥ निळा म्हणे कांहीचि नाहीं । तेंचि या बीज विश्वा पाहीं ॥४॥