भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया

purnabrahma mani kansachya bhayasi | vatel manasin konachiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥ इच्छामात्रें करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचें ॥२॥ नंदाचें सुकृत झालें अगणीत । म्हणोनी भगवंत आला तेथें ॥३॥ सर्वां होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥