भजनी मालिका

भजने

नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥ ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामेंचि पावन केली क्षिती । घोषें निजशांति पातका ॥१॥ जये गांवी जये देशी । वसती त्यांसी सुखलाभ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं ॥१॥ तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥ तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥ गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥ घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचे कीर्तनीं सर्वदा ॥१॥ देवोचि त्याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ।।१।। कैसा सत्त्वाचा समुद्र। ऐसा नाहीं नृपवर ||२||

रचनाकार: संत जनाबाई

नारदें केलासे प्रश्न । सांगतसे जगज्जीवन । कलीमाजी प्रमाण । कीर्तन करावें ॥१॥ महापापीया उद्धार । पावन करती हरिहर । ब्रह्मादि समोर । लोटांगण घालिती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥ कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥ नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥ गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥ हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥ कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नारायणा तुमच्या चरणीं । भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥ मोक्ष सर्वदा तिष्ठत । चरणीं जोडोनियां हस्तक ॥२॥

रचनाकार: संत निळोबा