भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें

namyachen karan deven naval kele | dhondobache jahalen suvarna ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥ गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥ न कळे लाघव देवाचें सर्वथा । म्हणती नामा आमुचा कर्ता जाहला आतां ॥३॥ एका जनार्दनीं द्रव्याचिया आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥