भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी

namyache lagnasathi | chinta kari damasheti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी ॥१॥ नाहीं आपुले जवळी धन । कैसें होईल याचें लग्न ॥२॥ रात्रंदिवस गोणाईसी । निद्रा न ये पैं नेत्रांसी ॥३॥ माझ्या नामयाचें लग्न । एका जनार्दनीं करील कोण ॥४॥