भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा

namyasi sangatan nayake vichar | yenen फ़jitakhor kela nama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥ घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥ शिकविलें नायके व्यापारा न जाये । धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥ एका जनार्दनीं यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥