भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी

namenchi taralen namenchi tarale | jadajiv uddharile kaliyugi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥ ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥ पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढें ॥३॥ एका जनार्दनीं तारक हें नाम । पावती निजधाम गातां वाचे ॥४॥